उरुळी कांचन : व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर तत्त्वज्ञानातून ठरते, असे सांगणारा महानुभाव पंथ आहे. जेव्हा दंभ निर्माण होतात तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. महानुभाव पंथात जातिभेद नाही, तर केवळ तत्त्वज्ञान आहे. 12 व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला, असे उद्गार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले.
उरुळी कांचन येथे श्रीचक्रधर स्वामी अवतरणदिनानिमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात कंद बोलत होते. पुणे जिल्ह्यातील सर्वज्ञ चक्रधर स्वामी समाज प्रबोधन संस्था, पुणे जिल्हा महानुभाव सत्संग आणि उपदेशी मंडळ, श्रीकृष्ण सेवा मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, महंत श्री साळकरबाबा धुळे, सीताराम कुडव, महंत नागराजबाबा महानुभाव, पांडुरंग राऊत, राजेंद्र कांचन, दादासाहेब सातव, महादेव कांचन, सुदर्शन चौधरी, प्रकाश जगताप, हरिचंद्र कांचन, दत्तात्रय कांचन, कोंडिराम चौधरी, आनंदा चौधरी, संतोष चौधरी, भाऊसाहेब कांचन, अशोक वनारसे, संपत म्हेत्रे, नंदकुमार मुरकुटे, भीमराव सावंत, शरद वनारसे, राजेंद्र टिळेकर, नारायण भोर, संतोष कांचन, गुलाब दिघे, संजय वनारसे, दत्तात्रय डिंबळे, विनोद कांचन, अनिल ननावरे, शिवाजी भोसले, बबन कोलते, चंद्रकांत खेडेकर, रोहिदास मुरकुटे, दीपक सणस, अमोल भोसले, बाळासाहेब सणस, शांताराम चौधरी तुकाराम जगताप, बापुसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, सुभाष टिळेकर आदी उपस्थित होते.