महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर लोटला जनसागर !

0

मुंबई : महापरिनिर्वाणदिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करता यावे, म्हणून राज्यासह देशभरातून अनुयायींनी कालपासूनच रांग लावली आहे.

यावेळी अनुयायांनी दादर रेल्वे स्टेशनचे नामांतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्यात यावे या मागणीसाठी स्टिकर्स लावले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी महामानवास अभिवादन केले आहे. .