जळगाव। महानगरपालिकेच्या कायम कर्मचार्यांकडून शनिवारी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. शहर स्वच्छतेचे काम सकाळी 6 वाजताच सुरू करण्यात आले होते. यावेळी बांधकामविभागाचे तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी देखील हजर होते. बांधकाम विभागाच्या कर्मचारी वेस्ट मटेरीयल उचलत होते. तर अतिक्रमण विभागाचे कर्मचार्यांनी रस्त्यांवरील हातगाड्या जप्त करण्याची मोहिम राबविली. या मोहिमेअंतर्गत फुले मार्केट समोरील रस्ता, सुभाष चौक, शिवाजी रोड, दाणाबाजार परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच शहर पोलीस स्टेशनमागील भागाची स्वच्छता केली.
प्रांतअधिकार्यांना पाचारण
मार्केटच्या स्वच्छेता बोजवरा उडल्याचे पहाणीत दिसून आल्याने जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी नागरिकांना आरोग्याचा मोठा धोका उत्पन्न होवू शकतो अशी भिती व्यक्त केली. यानंतर त्यांनी प्रांतअधिकारी जलज शर्मा तातडीने बोलवून घेतले. जिल्हाधिकारी यांनी पुन्हा फुले मार्केटची पाहणी करीत जलज शर्मा यांना परिस्थिती दाखविली. त्यांनी तातडीने कार्यालयात जावून फुले मार्केटच्या स्वच्छतेबाबत अंतरीम आदेशाची नोटीस बजावली.
दाणाबाजार गेटवर सडलेला कचरा
जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी चौबे शाळेची पहाणी केली. चौबे शाळेत सर्वत्र अस्वच्छता आढळल्याने श्री. निंबाळकर यांनी महानगरपालिकेच्या सर्व शाळांची पहाणी करणार असल्याचे सांगितले. तसेच महानगरपालिकेच्या शाळांमध्ये देखील लवकरच स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी महात्मा फुले व सेन्ट्रल फुले मार्केटची पाहणी केली. मार्केटमध्ये सर्व ठिकाणी कचरा पडून होता. दुकानांवर दोर्या लटकविलेल्या होत्या. मार्केटच्या वरील मजल्यावर घाण आढळून आली. मार्केटमधील रिक्त हॉल कचर्याचे आगार बनल्याचे त्यांना दिसून आले.
मार्केटमध्ये तुंबलेली गटारींच्या सांडपाणीने दुर्गंधी
गोलाणी मार्केटमधील स्वच्छतेचा विषयमार्गी लागल्यानंतर आता प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील अस्वच्छता व अतिक्रमणाचा विषय हाती घेतला आहे. फुले व सेंट्रल फुले मार्केट याची पाहणी स्वतः उपविभागीय दंडाधिकारी जलज शर्मा यांनी शनिवारी केली. यावेळी शर्मा यांना मार्केट परिसरात प्रचंड कचरा, दुर्गंधी, तुंबलेली गटार व वाहणारे सांडपाणी, दुर्गंधी असे प्रकार आढळून आले.
दोन दिवसात स्वच्छता करण्याचे आदेश
प्रांतधिकारी यांनी मार्केट व परीरसाच्चा स्वच्छतेसाठी दोन दिवसाची मुदत दिली आहे. यामुळे त्यांनी फौजदारी दंड संहिता 1973 च्या कलम 133 नुसार कार्यवाहीची नोटीस बजावली आहे. या अंतर्गत रविवार 23 आणि सोमवार 24 जुलैपर्यंत फुले व सेंट्रल फुले मार्केटची सफाई महानगरपालिका आयुक्त, स्वतच्छता व आरोग्य विभाग, व्यापारी संघटना यांनी करयाची असल्याचे म्हटले आहे.
मार्केटची सफाई झाल्यानंतर पुन्हा पाहणी करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या स्वच्छतेच्या मोहिमेने नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहे शहरातील स्वच्छतेसाठी जिल्हाधिकार्यांनी घेतलेले निर्णय योग्य असल्याचे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.