महापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आबा गोरे

0

उपाध्यक्षपदी संजय कुटे यांची निवड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आबा विठोबा गोरे तर उपाध्यक्षपदी संजय दशरथ कुटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या पिंपरी येथील कार्यालयात शनिवारी (दि. 21 एप्रिल) झालेल्या बैठकीस सहकारी संस्था उपनिबंधक अधिकारी सचिन सरसमकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व प्रथम बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. यावेळी सचिवपदी सीमा अनिल सुकाळे व खजिनदारपदी महाद्रंग नामदेव वाघेरे यांची निवड करण्यात आली. सचिन सरसमकर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी व संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजूर्डे, राजाराम चिंचवडे, अंबर चिंचवडे, मनोज माछरे, चारुशिला जोशी, दिलीप गुंजाळ, यशवंत देसाई, सतीश गव्हाणे, रमेश चोरघे, भगवान मोरे, नथा मातेरे, नंदकुमार घुले, संस्थेचे व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर, उपव्यवस्थापक प्रल्हाद सुतार व सर्व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिका व पीसीएमटीतील 5 हजार 500 कामगार सभासद आहेत. भाग भांडवल 52 कोटी, ठेवी 52 कोटी, कर्ज वितरण 115 कोटी तर मागील वर्षी 9 कोटी 36 लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. थकीत कर्जाचे प्रमाण अर्धा टक्क्याहून कमी आहे. संस्थेने मागील वर्षी 11 टक्के लाभांश दिला आहे. कर्जदार सभासदाच्या मृत्यूनंतर सर्व कर्ज माफ करणारी एकमेव पतसंस्था आहे अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर यांनी दिली.