महापालिकेचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा

0

पुणे : महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत शिवाजीनगरमधील नरवीर तानाजी वाडी ते शिवाजी रस्ता परिसर तसेच कोंढव्यातील पारगे नगर भागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. या कारवाईत सुमारे 15 हजार 888 चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. या सर्व परिसरातील खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, ज्यूसबार, कुरिअर ऑफिस यांच्यासाठी करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे नष्ट करण्यात आली.
शिवाजीनगरमधील नरवीर तानाजी वाडी ते शिवाजी रस्ता परिसरातील कारवाईत सुमारे 5388 चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. या कारवाईत 1 उप अभियंता, 1 कनिष्ठ अभियंता आणि 18 कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय कोंढवा खुर्द परिसरातील पारगेनगर भागात करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 10 हजार 500 चौरस फूट इतके क्षेत्र मुक्त करण्यात आले. या कारवाईत 35 कर्मचार्‍यांचा समावेश होता.