महापालिकेच्या ६ कोटींच्या विकास कामांना मंजुरी

0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे सहा कोटी 68 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. वाय.सी.एम.हॉस्पिटल येथील यु.पी.एस. सिस्टीम (4 यु.पी.एस.) ची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यासाठी टॅक्ससहीत येणा-या सुमारे चार लाख 71 हजार रुपयांच्या खर्चास, वाय.सी.एम.हॉस्पिटल येथील चार टॉवर लिफ्टसचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी टॅक्ससहीत येणा-या सुमारे आठ लाख रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमनांक 41 भाटनगर येथे भाजी मंडई परिसरात काँक्रीटीकरण करण्यासाठी येणा- या सुमारे 32 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 25 मध्ये पेव्हींग ब्लॉक, गटर्स दुभाजक फुटपाथ व मनपा इमारतीची किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 40 लाख 99 हजार रुपयांच्या खर्चास, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये केंद्र शासनाचे धोरणानुसार सी.एस.आर ऍक्टीवीटी राबविण्यासाठी येणा-या सुमारे 70 हजार प्रतीमहा रुपयांच्या खर्चास, वाय.सी.एम रुग्णालयाकडील विविध वार्डसाठी आवश्यक खुर्चा खरेदीकरण्यासाठी येणा-या सुमारे 5 लाख 81 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

वृक्षारोपणासाठी मोठी रोपे पुरविणे व लागवड करुन 1 वर्ष देखभाल करण्यासाठी येणा-या सुमारे एक कोटी 32 लाख रुपयांच्या खर्चास, वृक्षसंवर्धन विभागासाठी 2 मीटर उंचीची वृक्षारोपणाची मोठी रोपे खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 32 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास, ‘ब’ प्रभागातील ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे तीन कोटी 60 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चास, चोविसावाडी शाळा व यशवंतनगर शाळेतील विद्यार्थी वाहतुकीसाठी करण्यासाठी येणा-या सुमारे 12 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.