पिंपरी-चिंचवड : महापालिका व हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स कंपनी यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज (बुधवारी) एच.ए मैदानावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये एच.ए मैदानावरील व लगतचा कचरा उचलण्यात आला. आयुक्त श्रावण हर्डीकर व हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका निरजा सराफ यांच्यासह कंपनीचे उपमहाप्रबंधक सी.व्ही.पुरम, ऑफिसर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी के. एन.नरोटे, मजदूर संघाचे उपाध्यक्ष विजय पाटील, प्रवीण मोरे, खजिनदार शंकर बारणे, प्रवीण रुपनर, वरिष्ठ कार्मिक अधिकारी सुनीता शिवतारे, जनसंपर्क अधिकारी अविनाश थोपटे, सहाय्यक आरोग्याधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील पालांडे, आरोग्य निरीक्षक एस.एम. इंगेवाड यांच्यासह सुमारे 100 कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण एच. ए. मैदानावरील व लगतचा कचरा उचलण्यात आला.