पिंपरी : प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य सरकारकडून दोन सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही अधिकार्यांनी पदभार स्वीकारला आहे. तर, पालिकेतील सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर यांची बारामती नगरपरिषदेत बदली झाली आहे. प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश डोईफोडे यांना 31 मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्यधिकारी मंगेश चितळे यांची पालिकेत वर्णी लागली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषदेचे मुख्यधिकारी नितीन कापडणीस हे देखील पालिकेत रुजू झाले आहेत.
* न्यायालयात म. फुले यांना अभिवादन
पिंपरी – पिंपरी न्यायालयामध्ये पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्यावतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. मारुती भापकर, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, अॅड. राकेश अकोले, अॅड. एस.टी. गायकवाड, अॅड, गुलाबराव चोपडे, अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. कालिदास इंगळे, अॅड. रविराज मिरचंदानी, अॅड. गणेश राऊत, अॅड. प्रतिमा शिंदे, अॅड. सुनील कड, अॅड. उमेश जाधव आदी उपस्थित होते. अॅड संतोष मोरे, अॅड. पी.एस. कांबळे, अॅड. सुनील माने, अॅड. अशोक जाधव यांनी महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देऊन अभिवादन केले.