जळगाव । आगामी होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीत आपल्या पक्षाची एकहाती सत्ता आणायची असून यासाठी सर्वांनी संघटनात्मक बांधणी करायची असून महाविस्तार संपर्क अभियानाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचून केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा जनते पर्यंत पोहोचवायचा आहे. कार्यकर्ते व पक्ष संघटनात्मक कार्यानेच जळगाव महानगर पालिकेवर भाजपाचाच महापौर नक्की होणार असे आत्मविश्वासाने आमदार भोळे यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, मनपा गटनेते सुनील माळी, जिल्हा पदाधिकारी उज्ज्वला बेंडाळे, नितीन इंगळे, सरिता नेरकर, महेश जोशी, मनोज भांडारकर मंडल अध्यक्ष प्रा.जीवन अत्तरदे, प्रदीप रोटे, राजू मराठे, राहुल वाघ, कपिल पाटील, धीरज सोनवणे, विनोद मराठे, संजय लुल्ला, रिंकू चौधरी, संजय शिंदे, आशिष वाणी, दत्तू जाधव, नितीन गायकवाड, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, नवनाथ दारकुंडे, मनोज काळे, प्रकाश बालानी, उदय भालेराव, आघाडी अध्यक्ष अशोक राठी, गणेश पाटील, केशव नारखेडे, सर्जेराव बेडीस्कर, चंद्रकांत डी.पाटील, विजय पाटील, शक्ती महाजन, किसान मराठे, हेमंत शर्मा, सागर पाटील, किरण बेंडाळे, रत्नाकर फेक्रीकर, राजेंद्र वाणी, गणेश वाणी, प्रकाश पंडित, दिशांत दोषी, गणेश वाणी, दीपक पवार, शेखर खंगार, सुनील सरोदे, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रास्ताविक मनोज भांडारकर यांनी केले, आभार विशाल त्रिपाठी यांनी मानले.