महापौरच नव्हे तर पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच

0

मुंबई : मुंबईचा महापौरच नव्हे तर पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत केला.

सलग पाचव्यांदा मुंबईकर जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवून शिवसेना हा एक क्रमांकाचा पक्ष आहे हे दाखवून दिले. मुंबई महापालिका निवडणुकीतूल हा निकाल हे अपयश नाही. भाजपला मिळालेला विजय हा सत्ता, संपत्ती आणि त्यांनी वापरलेली साधने यामुळे आहे. आमच्या अनेक जागा अत्यंत थोड्या मतांनी गेल्या. आम्हाला उत्तर भारतीय तसेच मुस्लिम मतदारांनीही मतदान केले आहे. बेहरामपाड्यात प्रथमच आमची जागा निवडून आली आहे, से ते म्हणाले.
या निवडणुकीत अनेक मतदारांची नावे याद्यांत नव्हती. हा मोठाच घोळ आहे. याबद्दल निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.