महापौरपदासाठी निवडणूक अटळ; भाजपनेही घेतले उमेदवारी अर्ज

0

बिनविरोध निवडीची शक्यता मावळली ; नगरसेवकांमध्ये चलबिचल ; नेते धास्तावले

जळगाव । खान्देश विकास आघाडी, मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना व जनक्रांती या पक्षांनी एकत्रितपणे आज मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांचा महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौरपदासाठी मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी खाविआ, मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना व जनक्रांतीचे नगरसेवक उपस्थित होते. राहु काळ संपल्यानतंर ललित कोल्हे यांनी सर्व मित्रपक्षांतील पदाधिकार्‍यांच्या उपस्थित दुपारी 12 वाजतून 7 मिनिटांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव अनिल वानखडे याच्याकडे तिन अर्ज सादर केलेत.

यांची होती उपस्थिती
पहिल्या अर्जात सुचक म्हणून खाविआचे अध्यक्ष रमेश जैन, अनुमोदक म्हणून गणेश सोनवणे, दुसर्‍या अर्जावर सूचक म्हणून मनसेच्या लिना पवार, अनुमोदक खुशबू बनसोडे तर तिसर्या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीचे रविंद्र मोरे आणि अनुमोदक म्हणून शरीफ पिंजारी यांची स्वाक्षरी आहे. यावेळी स्थायी समिती सभापती वर्षा खडके, विजय कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधु कोल्हे, सुनिल महाजन, कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, चेतन शिरसाळे, संदेश भोईटे, सुनिल पाटील, दत्तात्रय कोळी, मिलिंद सपकाळे, शरद तायडे, अजय पाटील, सदाशिव ढेकळे, इकबाल पिरजादे, संतोष पाटील, जयश्री इंगळे, सविता शिरसाठ, माजी महापौर आशा कोल्हे, अश्‍विनी देशमुख, नितीन बरडे, अमर जैन, अनंत जोशी, रविंद्र मोरे, शरीफ पिंजारी, लिना पवार, पद्माबाई सोनवणे, खुशबू बनसोडे, पार्वता भिल, कांचन सोनवणे, संगीता राणे, ममता कोल्हे, प्रमोद नाईक, प्रशांत नाईक उपस्थित होते.

भाजपाने सहकार्याची भूमिका घ्यावी ..
यावेळी बोलतांना खाविआचे रमेश जैन यांनी सांगीतले की, भाजपा वगळता सर्व पक्ष एकत्र झाले आहेत. त्यामुळे भाजपानेही आता सहकार्याची भूमिका घ्यावी, उमेदवार न देता बिनविरोध निवडणुकीचा पायंडा पाडावा असे आवाहन त्यांनी केला. सर्वपक्षांच्या सहकार्याने विकासकामे करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगीतले. आज शुक्रवारी आ. सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखशली झालेल्या भाजपाच्या बैठकीत महपौरपदाची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेवार म्हणून नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. पृथ्वीराज सोनवणे यांनी दोन अर्ज घेतले. सोमवार (दि.4) उमेदवारी अर्ज दाखल कारणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेते सुनिल माळी, रविंद्र पाटील, विजय गेही, अनिल देशमुख, नवनाथ दारकुंडे उपस्थित होते. भाजपतर्फे उमेदवारी अर्ज घेण्यात आल्यामुळे आता बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आता मावळली आहे.