पिंपरी चिंचवड : महापौर राहूल जाधव यांनी चिंचवड ऑटो क्लस्टर येथून बीआरटीएस मार्गाच्या पाहणी दौर्यास सुरुवात केली आहे. काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावरील बस सेवा सुरु करण्यासाठी बसेसच्या उपलब्धतेबाबत त्यांनी चौकशी केली.
हे देखील वाचा
बीरआरटीचे चारपैकी तीन मार्ग सुरु केले आहेत. चौथ्या मार्गासाठी पीएपीएलकडे बस देण्याची मागणी केली आहे. पीएमपीएमएलच्या अधिकार्यांना बस उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. यावेळी सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे , प्रमोद ओंबासे , उपअभियंता विजय भोजने, दिपक पाटील, संजय साळी यांच्यासह पीएमपीएलचे अधिकारी उपस्थित होते. काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा विकास आराखड्याप्रमाणे विकास करण्याच्या सूचना बीआरटीएस विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. बीआरटीएस कॉरीडॉरवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहने दिसून आली. त्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश महापौर जाधव यांनी पोलिसांना दिले आहेत.