महापौरांचे विमान उडाले बार्सिलोनाकडे 

0
पिंपरी-चिंचवड : महापौर राहुल जाधव यांनी गुरुवारी बार्सिलोनाकडे टेकऑफ केले. स्मार्ट सिटीच्या अभ्यास दौ-यात तीन दिवसांनी ते सहभागी होणार आहेत. स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान ’स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ’रिप्रेझेंटेटिव्ह स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेस’ यांच्याकडून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला मिळाले होते. त्यानुसार सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील यांनी सोमवारीच टेकऑफ केले होते. त्यानंतर दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच आज महापौर राहुल जाधव यांनी दौर्‍यात सहभागी होण्यासाठी बार्सिलोनाकडे ’टेकऑफ’ केले आहे.