महापौरांनी परस्पर खोटी सही करून राजीनामा घेतला-छिंदम

0

अहमदनगर-अहमदनगरच्या उपमहापौरपदी असताना श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढले होते. यासंदर्भातले एक संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ही बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली आणि शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला. राज्याच्या जनतेने व्यक्त केलेला हा रोष आणि राग एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की श्रीपाद छिंदमला भाजपाने पक्षातून बडतर्फ केले. उपमहापौरपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. परंतु मी स्वत:हुन राजीनामा दिलेला नसून शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर केला आणि बनावट सहीने उपमहापौरपदाचा राजीनामा तयार केला असा आरोप श्रीपाद छिंदमने केला आहे.

याप्रकरणी शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी श्रीपाद छिंदमने केली आहे. भाजपा खासदार दिलीप गांधी यांनीच छिंदमची भाजपातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले होते, त्याचवेळी त्यांनी त्याचा राजीनामा लिहून घेतल्याचेही स्पष्ट केले होते.