महापौरांविरुद्ध गुन्हा दाखल करा

0

पुणे । महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संबंधित लोकमान्य टिळक विचार मंच संचालित नारायण पेठेत गोगटे शाळेत चालविली जाणारी अभ्यासिका आणि व्यायामशाला अनधिकृतपणे व्यावसायिक पद्धतीने वापरली जाते, याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की, 2010 पासून गोगटे प्रशालेच्या इमारतीमधील तिसर्‍या मजल्यावरील अभ्यासिका व व्यायाम शाळा रात्रंदिवस मंचतर्फे चालविली जाते. अभ्यासिकेत एमपीएससी आणि युपीएससी विद्यार्थ्यांकडून दरमहा 300 रुपये फी आकारली जाते. मान्यता न घेता दुसर्‍या मजल्यावरील खोल्या वापरल्या जातात. राजकीय दबाब वापरून माननियांच्या संस्थेने व्यावसायिक वापर करून महापालिकेचे लाखो रुपये बुडविले आहेत.संस्थेचा पुणे महापालिका मालमत्ता व व्यवस्थापन विभाग यांच्यात करार झालेला नाही. तसेच वापर संस्थेकडून होत असला तरी लाखो रुपयांचे वीज बिल माता शिक्षण विभाग भरीत आहे. या अभ्यासिकेमधील 500 ते 600 तरुण-तरुणी या शाळेतील मैदानातील स्वच्छतागृह वापरीत आहेत. त्याचा त्रास शालेय मुलांना सहन करावा लागतो. या संदर्भात महापालिका उपायुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली असता, मी कोठे-कोठे पाहाणार असे मोघम उत्तर देऊन दुर्लक्ष करतात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.भाडे करार न करताच चाललेल्या या प्रकारात महापौरांच्या संस्थेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे