जळगाव । महापालिकेच्या महापौर निवडीची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी 7 सप्टेंबर रोजी होत आहे. महापौरपदासाठी मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांचाच एकमेव अर्ज आहे. त्यामुले कोल्हे यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. यावर गुरावारी जिल्हाधिकार्यांच्या उपस्थित होणार्या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.खान्देश विकास आघाडीचे नितिन लढ्ढा यांनी नेते सुरेश जैन यांच्या आदेशाने महापौरपदाचा राजिनामा दिला आहे. त्यानतंर रिक्त झालेल्या महपौर पदाच्या निवडीसाठी प्रशासनाने प्रकीया सुरु केली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता सतरा मजली इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात जिल्हाधिकारी कीशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. कोल्हे यांचाऐकमेव अर्ज असल्याने त्याच बिनविरोध निवड निश्चित आहे. गुरुवारी निवडीची औपचारीकता पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्या घोषणेने यावर शिक्कामोर्तब होणार आहे.