कझाकस्तानच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे नेतृत्व करणार महापौर मुक्ता टिळक

0

नवी दिल्ली – कझाकस्तानची राजधानी अस्तना येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय महापौर महासभा भरवण्यात येणार असून, या सभेला जगभरातील महापौर उपस्थित राहणार आहेत. ही सभा 2 ते 3 जुलै रोजी होणार आहे. या सभेचे उद्घाटन कझाकिस्तानचे अध्यक्ष नुरसुलतान नझरबायेव यांच्या हस्ते होणार आहे. कझाकस्तानची राजधानी अस्ताना ला २० वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर बेल्ट अॅन्ड रोड या प्रकल्पालाही ५ वर्षे पूर्ण झाले आहेत,याच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेमध्ये भारताचे नेतृत्व पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या करणार आहेत. या सभेच्या व्यवस्थाचालकांने लंडन, बँककाँग आणि सिडनीच्या महापौरांनेही यामध्ये सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर यामध्ये ६० देशांमधून २ हजार पेक्षा अधिक लोक सहभागी होतील, असा अंदाज ही त्यांनी वर्तवला आहे. यामध्ये ६० महापौर , ३० राजकीय नेते , वाणिज्य आणि उद्योग त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संस्थातील २०० तर 150 हून अधिक परदेशी वक्ते आणि नियंत्रण प्रतिनिधींचाही सहभाग असेल.