महाबळ परीसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून सातत्याने दुचाकींची चोरी होत असल्याने दुचाकी चालकांमध्ये भीती पसरली आहे. महाबळ परीसरातून प्रौढाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांची टोळी सक्रिय
प्रमोद दत्तू खरोटे (42, रा.हरीओम नगर, असोदा रोड, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ते महाबळ परीसरात नोकरीला आहे. बुधवार, 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे दुचाकी (एम.एच.19 ए.डी. 6985) ने महाबळ परीसरात कामाला गेल्यानंतर महाबळ येथील विद्युत नगरीत पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी लांबवली. गुरुवारी दुपारी दोन वाजता रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.