महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्यशासन अग्रणी

0
क्रांती संघटनेचे शितोळे यांनी केले विचार व्यक्त
सांगवी : पुर्वापारपासून आमचा रामोशी समाज अद्याप तसाच मागासलेला आहे. रामोशी समाजातील बांधव अजुनही कमी उत्पन्न गटात मोडत आहेत. त्यामुळे या बांधवांना आर्थिक बाजूने मजबूत करण्यास राज्यशासन लवकरच उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून देणार असून याबाबत राज्य शासन अग्रणी असल्याचे मत जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी व्यक्त केले.
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती कार्यक्रमात सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यात शितोळे बोलत होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते बबनराव खोमणे, खजिनदार संजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, बाळासाहेब मदने, अरविंद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भारत जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष मदने, लालासाहेब मसुगडे, लखन आडके, प्रकाश खोमणे, अ‍ॅड.राहुल मदने, धनाजी जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
राहुल भंडलकर, मधुकर जाधव, मधुकर भंडलकर, संतोष बोडरे, हणमंत खोमणे, विनोद चव्हाण, लालासाहेब मदने, हेमंत भंडलकर, बाळासो यादव, गणेश बोडरे, चव्हाण, जाधव, मदने यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी केले तर आभार सोमनाथ मसुगडे यांनी मानले.