महामार्गावरील साईटपट्टीवरून दुचाकी घसरल्याने पाणीपुरी विक्रेता ठार !

0

जळगाव: दुचाकीत पेट्रोल भरुन पुन्हा घराकडे परततांना साईटपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून महार्गावर पडलेल्या दुचाकीस्वार पाणी पुरी विक्रेता धर्मेंद्र मिथलेश बरहार (वय 16 मूळ रा. उथरगाव, उत्तरप्रदेश) या तरुणाला ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास बांभोरी महाविद्यालयाजवळ घडली. अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच आला बांभोरीत मेव्हण्याकडे
मूळ उत्तरप्रदेश राज्यातील उथरगाव जि. जालोन येथे धर्मेंद्र आई, वडील व भाऊ या परिवारासह वास्तव्यास होतो. दोन ते महिन्यांपूर्वी तो कामानिमित्ताने त्याचे बांभोरी येथील मेव्हणे सुनील परमलाल बरहार व बहिण पूमन सुनील बरहार यांच्याकडे आला होता. बांभारो येथील बसस्टॉपवर रोज तो पाणी पुरीची गाडी लावून उदरनिर्वाह करत होतो.

दुचाकीत पेट्रोल भरुन परततांना अपघात
धर्मेंद हा शनिवारी सकाळी त्याची दुचाकीत (एम.एच.19.बी.वाय.8521) पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडला. बांभोरी गावापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर त्याने दुचाकीत पेट्रोल भरले. यानंतर पुन्हा बांभोरीकडे निघाला. यावेळी खोल साईडपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तो तोल जावून महामार्गावर पडला. यावेळी पाळधीकडे जाणार्‍या ट्रकने ( डब्लू.बी. 17, 4335) त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बांभोरी येथील ग्रामस्थांनी त्याला ओळखले. त्याची ओळख पटविल्यावर त्याचे मेव्हण्यांना माहिती देण्यात आली. जैन इरिगेशनच्या रुगणवाहिकेने मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीसांनी ट्रकसह ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.