महामार्गावर काँग्रेसचा रास्तारोको

0

धुळे । पेट्रोल डिझेल दरवाढीच्या भडक्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. इंधनांच्या दरवाढीमुुळे महागाईने कळस गाठला आहे. महागाईमुुळे जनता बेजार असतांना मोदी सरकार चार वर्ष पुर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करीत आहे. सर्वसामान्यांच्या सरकारविरोधी भावनांना वाट मोकळी करुन देत शनिवार, 26 रोजी काँग्रेस रस्त्यावर उतरली. मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेत महामार्ग रोखून धरला. निदर्शने केले आणि विश्‍वासघात दिन पाळला. तर धुळ्यात युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपांवर पाकिस्तानची साखर वाटली आणि मोदी सरकारचा निषेध केला.

विविध पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे रोजी चार वर्षे पूर्ण झाली. मात्र या चार वर्षात मोदी सरकारने सर्वच भ्रमनिरास केला असून निव्वळ आश्‍वासनांचे प्रलोभन दाखविले आहे. महागाई वाढली, पेट्रोल दर भडकले, बेकारी वाढली, शेतमालाला भाव नाही, भ्रष्टाचारात कमी नाही अशा सार्‍याच पातळ्यांवर हे सरकार नाकाम ठरले आहे. शनिवारी सकाळी सकाळी गोराणे फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांची रांगच रांग लागली होती. रास्तारोको करतांना काँग्रेसचे शामकांत सनेर, जयवंत बोरसे, किशोर पाटील, साहेबराव खारकर, माधव बडगुजर, पांडूरंग माळी, प्रकाश पाटील, शरद पाटील, सुनिल चौधरी, बापू महाजन, प्रकाश वाघ, बाजीराव अहिरराव, सुरेश देसले, एम.पी. पाटील, अनिल सिसोदे, पंढरीनाथ सिसोदे, गणेश नेतले, राजेंद्र देवरे, दीपक भिल, प्रमोद सिसादे, गणेश पाटील, दत्तु माळी, राजेंद्र पाटील, रविंद्र पाटील, बाळू माळी, मनोज धनगर, पंकत सोनवणे, महेंद्र देसले, खंडू भदाणे, जयवंत धनगर, भाईदास निळे, सुनिल लांडगे, विजेंद्र पाटील, राजेंद्र शिरसाठ, ज्ञानेश्‍वर पाटील, भरत पाटील, लोटन माळी, सुनिल माळी, श्रीराम पाटील, संदीप पाटील, डॉ. संजय पाटील, भटू पाटील, सुहास पाटील, सुनिल देसले, गोपाल धोबी, डॉ. उमेश पाटील, शाहबाज शहा, मुन्ना खाटीक, राकेश राजपुत, कुलदीप निकम आदी सहभागी झाले होते.