महामार्ग हस्तांतरण विरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

0

पाचोरा। महामार्ग क्षेत्रातील मद्यविक्री बंदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील राज्य परिवहन मार्ग महापालिकेकडे वर्ग केल्याच्या कृतिचा तीव्र विरोध दर्शवित पाचोरा येथील जारगाव चौफुली येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात रा.काँ.विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय वाघ, नितीन तावडे, ता. अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील 500 मी. अंतरातील मद्यविक्रीची दुकाने व बार बंद करण्यात आली आहेत. महामार्गावरील अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी हे निर्देश देण्यात आले असून 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र याच कालावधित राज्यशासनाच्या (सार्वजनिक बांधकाम विभाग) अखत्यारीत असलेले काही महामार्गाचे हस्तांतरण महापालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

कर्जमाफीचे तहसिलदारांना दिले निवेदन
एकीकडे सामाजिक दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालय चांगले निर्णय घेत असतांना केवळ मद्यसम्राटांना वाचविण्यासाठी अतिशय तत्परतेने महामार्ग हस्तांतरण करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात असतांना कृषिकर्ज माफी सारखे निर्णय घेण्यास हे सरकार विलंब लावत आहे. मात्र, मद्यसम्राटांच्या हिताची काळजी तत्परतेने घेतली जात असल्याचे मत ता. अध्यक्ष विकास पाटील यांनी व्यक्त केले.

यांनी घेतला सहभाग
यावेळी पं.सं.सदस्य ललित वाघ, पितांबर पाटील, नाना देवरे, खलील देशमुख, प्रकाश पाटील, मोतीलाल चौधरी, भगवान चौधरी, भगवान मिस्तरी, सुदाम वाघ, विशाल पाटील, प्रकाश भोसले, नंदू पाटील, प्रल्हाद पाटील, अझहर खान, आयुब बागवान, महमद मिस्तरी, संतोष चौधरी, अँड़ दिपक पाटील, राजू वाघ यासह तालुक्यातील असंख्या कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी केशव पातोंड, पो.नि.नवलनाथ तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश आंधळे, हवलदार छबुलाला नागरे, गजू काळे, राहुल सोनवणे, राहुल नेहते, प्रकाश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.