महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

0

भुसावळ । महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. जामनेर रोडावरील केशवनगरातून सजवलेल्या वाहनावर महाराणा प्रताप यांचा पुतळा ठेवण्यात आला. पूजन झाल्यावर मिरवणूक सुरू झाली. क्षत्रिय महासभा युवक सचिव दामोदर राजपूत, दलजीत राजपूत, नकुल राजपूत, संजयसिंग चव्हाण, प्रशांत राजपूत, भागवत राजपूत, आनंदसिंग राजपूत, सुरेश राजपूत, रायसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बुटासिंग चितोडिया या मिरवणुकीत सहभागी झाले.

टिंबर मार्केटजवळ समारोप
टिंबर मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप झाला. समाज बांधवांची उपस्थिती होती.