जळगाव । महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रतापसिंह यांच्या बहिणाबाई उद्यान परिसरातील पुतळ्यास महापौर ललित कोल्हे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आयुक्त चंद्रकांत डांगे, उपमहापौर गणेश बुधा सोनवणे, भाजपा गटनेते सुनिल माळी, नगरसेविका सुचिता हाडा, महाराणा प्रताप सिंह समिती अध्यक्ष डॉ.जी.एन.पाटील, कार्यालय अधिक्षक सुनिल गोराणे, पुरुषोत्तम जोशी, दिलीप पाटील, राजेंद्र सुलाखे, मनोज चंद्रात्रे तसेच महाराणा प्रताप सिंह समिती सदस्य चंद्रसिंह पाटील, भाऊलाल पाटील, उदय पाटील, आशिषसिंह हाडा, एन.बी.पाटील, विनोद शिंदे, नंदनसिंह पाटील, किरण राजपुत, रोशन राजपुत, अतुलसिंह हाडा, चंद्रशेखर राजपुत, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
महावितरण कार्यालयात अभिवादन
महावितरण जळगांव परिमंडल कार्यालय येथे महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी जलगांव परिमंडल अरूण शेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अरूण शेलकर यांनी महाराणा प्रताप यांचा जीवन पट उलगडून दाखविला. याप्रसंगी संध्या पाटील, आर. आर. सावकारे, योगेश सरोदे , वर्कर्स फेडरेशन सर्कल सेक्रेटरी विरेंद्रसिंग पाटील, म.रा.वीज तां. का. संघटना सर्कल अध्यक्ष प्रभाकर सपकाळे, वर्कर्स फेडरेशन विभाग सचिव मुकेश बारी, व्ही. एन. तायडे ,दीपक कोळी , नितीन पाटील , दिलीप बाविस्कर ,निलेश भोंसले,विक्रांत देसले, सागर पाटील, अविनाश पाटील, फकीरा पाटील सहीत कामगार कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.