महाराष्ट्राची कन्या करणार माऊंट फुजी पादाक्रांत

0

मुंबई-पर्वतरांगा सर करत सन्मान मिळविण्याचा अनेकांचा मानस असतो.गिर्यारोहणाप्रती असणारी हीच आवड जपत महाराष्ट्राची कन्या थेट माऊंट फुजी सर करणार आहे. वसई येथील ३५ वर्षीय हर्षाली वर्तक यांनी ३,७७६ मीट उंचीवर असणाऱ्या माऊंट फुजी सर करण्याचा मानस बाळगला आहे. ८ गिर्यारोहकांच्या साथीने वर्तक माऊंट फुजी हा जिवंत ज्वालामुखी सर करणार आहेत. १२ हजार ३९० फुट उंचीवर असणाऱ्या या ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक १७०७ मध्ये झाला होता.

५ सप्टेंबरपासून सुरु होणारा हा ट्रेक ९ सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. चेन्नई, गुरुग्राम आणि देशाच्या इतर भागातील ट्रेकर्स यात सहभागी असणार आहेत. मुख्य म्हणजे या पूर्ण टीममध्ये हर्षाली वर्तक ही एकटीच महिला आहे.