महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी स्वस्त!

0

मुंबई : महाराष्टातील नागरिक पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळं त्रस्त असताना शेजारील राज्यांत मात्र पेट्रोलचे दर १३ ते १५ रुपयांनी कमी असल्याचं दिसतंय. शेजारच्या गुजरात राज्यात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर ९ रुपयांनी कमी आहेत. राज्यातील नंदुरबार जिल्ह्यापासून २२किमी अंतरावर असलेल्या गुजरात राज्याच्या सीमेवर पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी आहेत. त्यामुळं सीमावर्ती भागातील वाहनचालक गुजरातमध्ये जाऊन पेट्रोल भरताना दिसत आहेत.

त्यासोबत राज्यात सर्वात महाग पेट्रोल नांदेड जिल्ह्यातील सीमेवर मिळत असून इथूनच केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात पेट्रोलचे दर चार ते पाच रुपयांनी कमी आहेत.

महाराष्ट्राच्या सीमेलगत आणखी एक महत्त्वाचं राज्य म्हणजे गोवा. गोवा येथे पेट्रोलचा दर ७५ रुपये प्रति लिटर इतका असून गोव्यापासून अगदी जवळ असलेल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोलचा दर ९१ रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात नऊ रुपये जास्त कर

दुष्काळी कर तीन रुपये
महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये
शिक्षण कर एक रुपया
स्वच्छ भारत अभियानाचा एक रुपया
कृषी कल्याण अभियान एक रुपया