पंकजा मुंडेच नाही तर अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर; संजय राऊत यांचा दावा

0

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान आता अनेक नेत्यांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळविला आहे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये अनेक नेत्यांची नावे समोर येत आहे. त्यातच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील फेसबुक पोस्ट लिहून आपण पुढील भूमिका ठरविणार असणार असे जाहीर केले आहे. १२ डिसेंबरला होणाऱ्या मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करतील. तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर असून येत्या काळात ते दिसेलच असे विधान केले आहे.

पंकजा मुंडे ह्या शिवसेनेत प्रवेश करणार का? हे येत्या १२ डिसेंबरला कळेलच असेही त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांच्याबरोबर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. त्यातच त्यांनी आता ट्वीटरवरील बायोवरील भाजपचा उल्लेख काढून टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेला फोटो देखील काढला आहे. त्यामुळे आता त्या भाजपा सोडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.