महाराष्ट्रातील आमदारांवर अतिरेकी हल्ला

0

मुंबई-महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाच्या पंचायत राज समिती ही दौऱ्यावर असतांना जम्मू काश्मीर राज्यातील अनंतनागा जिल्ह्यात त्यांच्यवर अतिरेकी हल्ला झाला. सुदैवाने यात महारष्ट्रातील पाच आमदार बचावले आहे.  समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे, सदस्य आमदार विक्रम काळे, दीपक चव्हाण, सुरेश पाटील, तुकाराम काते आदी आमदार या हल्ल्यात बचावले आहे. महाराष्ट्राचे पाच आमदार अतिरेकी हल्ल्यातून बचावले आहे. अनंतनागा जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हे बाँब फेकण्यात आल्याचे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.