महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा २१५ वर

0

मुंबई: राज्यात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच असून आज आणखी १५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात वाढलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील पाच, मुंबईतील तीन, नागपूरमधील दोन तसंच, नाशिक व कोल्हापुरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे.

करोनाचा तिसरा टप्पा अत्यंत घातक मानला जात आहे. या टप्प्यात करोनाचे रुग्ण गुणाकार पद्धतीने वाढण्याची शक्यता असल्यान या टप्प्यात प्रवेश करू नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस व सर्व प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला एका आकड्यात वाढणारे करोनाचे रुग्ण आता दोन आकड्यांत वाढू लागले आहेत. ही राज्यासाठी चिंताजनक बाब मानली जात आहे.