पुन्हा टेन्शन …. शासनाने पुन्हा मारले …!

मुंबई – राज्य शासनाने संचार बंदिच्या निर्बंधांमध्ये अतिशय महत्वाचे बदल केले आहे. ज्यामध्ये आत्ता नागरिकांना  सकाळी ७ ते ११ या वेळेतच किराणा, भाजीपाला व फळे या अत्यावश्यक वस्तू विकत घेता येणार आहे.

शासनाने गेल्या १५ तारखेला राज्यात १५ दिवसांच्या संचार बंदीची घोषणा केली होती. यात आज महत्वाचे बदल केले आहेत.

निर्बंधांमध्ये अतिशय महत्वाचे बदल

राज्य सरकारने नव्या निर्बंधांबाबत आदेश काढून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश केला आहे.

१. सर्व किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकरची अन्नपदार्थांची दुकाने, मांस-मच्छी-मटण विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्य (छत्री, रेनकोट, ताडपत्री इ.) विकणारी दुकाने यांना सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे.

२. दरम्यान, वरील सर्व दुकानांमधून होम डिलीव्हरी मात्र सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

३. स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापनाला कोणत्याही सेवेचा किंवा सुविधेचा समावेश अत्यावश्यक सेवा किंवा सुविधेमध्ये करायचा असल्यास त्यासाठी राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापनाची परवानगी घेणं बंधनकारक असेल.