महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ४९० वर

0

मुंबई – महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसत आहे. गुरुवारपर्यंत ४२३ वर असलेली संख्या आता ४९० वर पोहचली आहे. आज ६७ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्राचे टेन्शन आणखी वाढले आहे. महाराष्ट्रात सापडलेल्या ६७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण मुंबईतले आहेत.

देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी आहे. अशात आता देशातलीही संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रातही लॉकडाउन आहेच. लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळा अन्यथा आज बाहेर फिरणारे उद्या रुग्णालयांमध्ये दिसतील असंही अजित पवार यांनी गुरुवारीच म्हटलं होतं. दरम्यान गेल्या २४ तासात महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ६७ ने वाढली आहे. एकूण ४९० त्यापैकी ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११ हजार ९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.