मुंबई: देशात कोरोना ग्रस्तांचा संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक उपाययोजना करून देखील आकडेवारी वाढतच आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. आज बुधवारी महाराष्ट्रात शंभरहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 1100च्या पुढे गेला आहे. आज तब्बल 117 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे हा आकडा 1135 वर पोहोचला आहे. आजच 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोमुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 72 वर पोहोचली आहे.