मुंबई । देशभरात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून, अनेकजण या आजाराचे बळी पडले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वाईन प्लूचे सर्वाधिक बळी सापडले आहेत. महाराष्ट्रात एकूण 3750 रुग्ण सापडले असून 381 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून ते 6 ऑगस्ट 2017 पर्यंत जमा केलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली आहे. कर्नाटकमध्ये 2805 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, तामिळनाडूत एकूण 2956 रुग्ण सापडले आहेत.