महाराष्ट्रासाठी ‘बॅड न्यूज’ : पंढरपूरच्या विठोबाचा प्रसाद महागला!

0

पंढरपूर : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने विठ्ठलभक्तांना कडवट बातमी दिली आहे. विठुरायाच्या दर्शनानंतर भक्तांना मंदिरातून मिळणार्‍या प्रसादरूपी लाडूची किंमत दीडपटीने वाढवण्यात आली आहे. लाडू बनविण्यासाठी बाहेरील संस्थेस ठेका दिल्यामुळे ही दरवाढ झाली असून, या निर्णयाबद्दल भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी प्रसादाच्या दोन लाडूचे पाकीट दहा रुपयांना मिळत असे. आता या पाकिटाची किंमत 15 रुपये झाली आहे. पूर्वी हा लाडूचा प्रसाद मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांच्याकडून बनवला जात असे. मात्र नवीन आलेल्या पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने मंगळवेढा येथील सुवर्णक्रांती सहकारी महिला संस्थेस लाडू बनविण्याचा ठेका दिला. ही संस्था 12 रूपये 50 पैसे या दराने लाडू पाकिट देत आहे; मात्र मंदिर समिती हेच पाकीट 15 रूपये दराने भाविकांना विकत आहे. त्यातून एका पाकीटामागे 2 रूपये 50 पैसे मंदिर समितीला मिळतात.

लाडूचे वजन वाढले!
विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे गोरगरीब भाविक येथील मंदिरातून प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू गावाकडे घेऊन जातात. पूर्वी प्रसादाच्या दोन लाडूचे पाकीट दहा रुपयाला मिळत असे. यंदापासून या पाकिटाची किंमत 15 रुपये झाली. मंदिराच्या विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी देत असताना भाववाढ का, असा संतप्त सवाल केला जात आहे. विठ्ठल मंदिरातून दरवर्षी जवळपास 50 लाख लाडूप्रसादाची खरेदी भाविकांकडून होत असते. याचाच अर्थ केवळ लाडूप्रसाद विक्रीतून 1 कोटी 25 लाख रूपयांचा फायदा मंदिर समितीला मिळतो. पूर्वी हा लाडूचा प्रसाद मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांच्याकडून बनवला जात असे. मात्र, नव्या मंदिर समितीने प्रसादाचा ठेका मंगळवेढा येथील सुवर्णक्रांती सहकारी महिला संस्थेस दिला. ही संस्था समितीला 12 रुपये 50 पैसे दराने दोन लाडू देणार आहे. पूर्वीचा लाडू 50 ग्रॅमचा होता. तो आता 70 ग्रॅम वजनाचा असेल, अशी माहिती मंदिर समितीने दिली आहे.