पिंपरी : येथील डॉ. डी.वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका कविता संदेश आल्हाट यांची महाराष्ट्र मुलींच्या (19 वर्षाखालील) कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलनात डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे सराव शिबीर संपन्न झाले. कविता आल्हाट या कबड्डी राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच आहेत. तसेच मोशी येथील लक्ष्यवेध स्पोर्टस् फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. प्राचार्या मृदुला महाजन यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. जानेवारीमध्ये दिल्लीत होणार्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आल्हाट या महाराष्ट्र कबड्डी मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी काम पाहणार आहेत.