जळगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ जळगाव केंद्रातर्फे गुरुवारी लोकनृत्य स्पर्धा घेण्यात अाली. यामध्ये शिरपूर केंद्राच्या धनगर नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. तर जळगावच्या ललित कला भवन केंद्राने सादर केलेल्या काेळी नृत्याने द्वितीय क्रमांक मिळवला. विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
पारिताेषिक वितरणप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष मनाेजकुमार पाटील, केंद्रीय पर्यावरण समिती सदस्य राजेंद्र नन्नवरे, विशेष अतिथी म्हणून अायएमएचे सचिव विलास भाेळे व सहायक फाैजदार मिलिंद केदारे उपस्थित हाेते. या वेळी केदारे यांनी प्राेत्साहनपर भाषण करीत मुलांना उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. परीक्षकांनी अावश्यक सूचना केल्या. यामध्ये लाेकनृत्यात काेणत्या बाबींची गरज असते याविषयी माहिती दिली. याप्रसंगी १२ नृत्यांचे सादरीकरण करण्यात अाले. विशेष म्हणजे मनाेजकुमार पाटील यांनी वैयक्तिकरीत्या प्रत्येक पारिताेषिक विजेत्या संघास एक हजार रुपयांचे प्राेत्साहनपर पारिताेषिक दिले. परीक्षक म्हणून डाॅ. अपर्णा भट-कासार, संजय पवार, ज्ञानेश्वर साेनवणे यांनी काम पाहिले. कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भानुदास जाेशी यांनी अाभार मानले. निकाल वाचन किशाेर पाटील यांनी केले.