शिक्रापूर । महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शिरूर तालुक्यातील मल्लांची निवड चाचणी सोमवारी न्हावरे परिसरातील शेंडगे वस्ती येथील राजमाता कुस्ती केंद्रात होणार आहे. वजनगटानुसार या शिरूर तालुका कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, प्रदीप कंद, राजेंद्र जगदाळे, मंगलदास बांदल, संदीप भोंडवे व जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष रामभाऊ सासवडे, कानिफ गव्हाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा कुमार गट, फ्री स्टाईल गादी विभाग तसेच माती विभाग या प्रकारामध्ये होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन बिरा शेंडगे, शंकर शेंडगे, तात्या शेंडगे व शिरूर तालुका कुस्तीगीर संघ यांनी केले आहे.