नागपूर : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. आमदार उन्मेषदादा पाटील यांच्या विनंतीवरून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत हा ठराव मांडला त्यानंतर विजय चौधरींचं अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली. मागील वर्षी विजय चौधरी हे दुसर्यांदा महाराष्ट्र केसरी झाले. त्यावेळी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी विजय चौधरी यांना मुंबई येथे मंत्रालयात नेवुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालुन दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी त्यांचे अभिनंदन करुन शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र वर्ष उलटूनही त्यांना नोकरी मिळाली नव्हती पण विजय चौधरी यांनी पुणे वारजे येथे कुस्ती मारुन तिसर्यांदा महाराष्ट्र केसरी पद पटकावल्याने चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्याची मान उंचावली आहे त्यावेळी आमदार उन्मेश पाटील यांनी बोलतांना सांगितले होते की त्यांच्या नोकरीसंदर्भात ते विधानसभेत ठराव मांडुन नोकरीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते त्यानुसार त्यांनी विनंती केल्याने त्यांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.