जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील विजय नथ्थु चौधरी यांना सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरी हा बहुमान मिळाल्याबद्दल गुरूवारी त्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, पोलिस उपअधीक्षक लतिफ तडवी, मनिष कलवाणीया, पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल आदी मान्यवर उपस्थित होते.