कॉलेजमध्ये शाखा उद्घाटनाचा उपक्रम
पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने रविवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकार्यांना नगरसेवक व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिन चिखले तसेच विद्यार्थी सेनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष हेमंत डांगे, उपशहर अध्यक्ष अनिकेत प्रभू, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, मनसे भोसरी विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर, शहर सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष विशाल मानकरी, अमित तापकीर यांच्या हस्ते नियुक्तिचे पत्र देण्यात आले. तसेच येणार्या काळामध्ये शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रभाग अध्यक्ष व शाखा अध्यक्ष नियुक्त करण्यात येईल. प्रत्येक कॉलेजमध्ये शाखा उद्घाटनाचा
उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील राजसाहेबांना अभिप्रेत असणारी विद्यार्थी संघटना उभारली जाईल. यापुढील काळात विद्यार्थी सेना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहील व अनेक विधायक उपक्रम शहरात राबवेल. शहर सचिव अक्षय नाळे यांनी सर्वांचे आभार मानले व शहर उपध्यक्ष अनिकेत प्रभू यांनी शुभेच्छा दिल्या.
नियुक्त केलेल्या पदाधिकार्यांचे नावे पुढील प्रमाणे –
शहर सचिव अक्षय नाळे, उपशहर अध्यक्ष अनिकेत प्रभू व अमित तापकिर, उपशहर अध्यक्ष (विद्यार्थी) गौरव लोटलीकर, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, सचिन शिंदे, बंटी कदम, महेश येवले. उपविभाग अध्यक्ष रुपेश पाटसकर, 16 प्रभाग अध्यक्ष वसंत पाटोळे, 24 प्रभाग शाखा अध्यक्ष शंतनू तेलंग, संघटीका प्राजक्ता गुजर, प्रभाग क्र. 17 शाखा अध्यक्ष सचिन भोंडवे, प्रभाग क्र. 32 अध्यक्ष -अक्षय नाईक, प्रभाग क्र. 23 उपाध्यक्ष अमोल राउत, प्रभाग क्र. 17 अध्यक्ष गणेश गायकवाड, प्रभाग क्र. 26 अध्यक्ष श्रीनिवास ससेराव, मोशी – चर्होली उपविभाग अध्यक्ष रवी लखापुरकर, प्रभाग क्र. 11 प्रभाग अध्यक्ष अतुल महाडिक.