मुंबई : पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या पर्यावरण विषयक विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आज पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यांना मिळाले पुरस्कार
वसुंधरा पुरस्कार 2018 :
तृतीय पुरस्कार : हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेड, खामगाव, बुलढाणा, 1 लाख 50 हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; द्वितीय पुरस्कार : इंडोकौंट इंडस्ट्रीज लि. कोल्हापूर, 2लाख रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; प्रथम पुरस्कार : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, डहाणू, पालघर, 3 लाख रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह.
उत्तेजनार्थ :
सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि.सांगली :
द्वितीय पुरस्कार : कर्जत नगरपरिषद, 2 लाख रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; प्रथम पुरस्कार : शिरपूर वरवाडे, नगरपरिषद, धुळे, 3 लाख रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह.;
उत्तेजनार्थ : अंजनगाव सुरजी, नगरपरिषद अमरावती :
द्वितीय पुरस्कार : बुटीबोरी सी.ई.टी.पी. प्रा.लि., 2 लाख रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; प्रथम पुरस्कार : कॉमन इन्फूनेंट ट्रिटमेंट प्लांट, ठाणे, बेलापूर असो. 3 लाख रुपये,प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह.
वसुंधरा लघू चित्रपट स्पर्धा-2016 :
तृतीय पुरस्कार : गायत्री पाठक, 50 हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; द्वितीय पुरस्कार : युनायटेड वे मुंबई, 75 हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; प्रथम पुरस्कार : प्रियंका सातारकर, 1 लाख रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह.
व्यावसायिक गट :
तृतीय पुरस्कार विभागुन : प्रसाद पाटील, 50 हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; रवींद्र मठाधिकारी, 50 हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; द्वितीय पुरस्कार विभागुन : हितेंद्र सोमानी, चित्रपट-सुरक्षित भविष्य, 75 हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ; सुमित पाटील, चित्रपट-कॅरीऑन, 75 हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह.