महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष जळगाव जिल्हा दौर्‍यावर

0

आज व उद्या जळगावसह भुसावळ, पाचोरा व चाळीसगावात भेट : सफाई कर्मचार्‍यांची समस्यांबाबत मुख्याधिकार्‍यांसोबत बैठक

भुसावळ : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनू सारवान हे 14 व 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या संदर्भातील दौरा जिल्हा प्रशासन व पालिका मुख्याधिकार्‍यांना प्राप्त झाला आहे. शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जळगाव महानगरपालिकेत सारवान हे आयुक्तांसोबत स्व्च्छता कर्मचार्‍यांच्या समस्यांबाबत बैठकीत चर्चा करणार आहेत तर दुपारी 12.30 वाजता ते जळगावातील प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतील. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भुसावळ मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याशी ते सफाई कर्मचार्‍यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेतील व त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता भुसावळातील प्रसिद्धीमाध्यमांशी ते संवाद साधणार आहेत.

पाचोरा व चाळीसगाव पालिकेतही बैठक
दुसर्‍या दिवशी शनिवारी, 16 रोजी सकाळी 11 वाजता पाचोरा नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत ते सफाई कामगारांच्या विविध समस्यांसोबत बैठकीत चर्चा करतील त्यानंतर दुपारी तीन वाजता चाळीसगाव नगरपरीषदेच्या मुख्याधिकार्‍यांसोबत त्यांची बैठक होईल. यावेळी ते कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍नांबाबत चर्चा करणार आहेत.