खान्देश अहिराणी क्रिडा मंचातर्फे केले आयोजन
चिंचवड : खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला-क्रिडा मंचाच्यावतीने मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रचार व प्रसारार्थ, मराठमोळ्या संकल्पनेवर आधारित ‘महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी-2018’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची राज्यस्तरीय महाअंतिम प्रतियोगिता सोहळा प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण या पाचही विभागातील 18 ते 59 वर्षांपर्यंतच्या मुली व महिलांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्यांचे ढोल ताशा व लेझीमने स्वागत करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाअंतिम प्रतियोगिता सोहळाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत डॉ.सारिका मेंगडे या प्रथम विजेत्या ठरल्या.
महाअंतिम सोहळ्यास गर्दी
हे देखील वाचा
या सोहळ्याच्या आयोजिका विजया मानमोडे होत्या. गृमिँग ट्रेनर म्हणून मृणाल गायकवाड, मेकअप आर्टिस्ट वैशाली भगोडीया, तसेच परिक्षक म्हणून अभिनेते पंढरीनाथ कांबळे (पॅडी), सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अमोद दोसी, अभिनेत्री आशा नेगी, जेष्ठ साहित्यिका डॉ. वर्षा देशमुख होते. या दिमाखदार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, निशिगंधा वाड, सुप्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे, अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, शरद पाटील, सिनेनिर्माता कैलास वाणी, भागवत सैंदाणे, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितिन घाणेकर व मृणाल गायकवाड यांनी केले. यशस्वीतेसाठी या सोहळ्याचे संयोजक अभिजीत मानमोडे, तिक्ष्णगत वाघमारे, लेफ्टनंट डॉ.जितेंद्र देसले, सुरेश मानमोडे आणि सागर कासार होते. या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी महाअंतिम सोहळ्यात असंख्य प्रेक्षकांना महाराष्ट्र भरातून गर्दी केली होती.
कोमल पवार सौंदर्य सम्राज्ञी
या दिमाखदार सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील स्पर्धक कोमल पवार या हृदय आणि फुफ्फुस निकामी झाल्याने आणि ब्रेनडेड झालेल्या मुलाचे हे दोन्ही अवयवाचे प्रत्यारोपण करून दुर्गर आजारातून जीवघेण्या अवस्थेतून सावरत आज उभ्या महाराष्ट्राला अवयव दानाचे महत्व पटवून देण्याचा वसा घेऊन सामाजिक कार्यात जीवन वाहून घेतले आहेत. अशा या कर्तबगार महिलेस प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सौंदर्य सम्राज्ञी हा किताब बहाल करण्यात आला. तसेच धुळे जिल्ह्यातील स्पर्धक यामिनी सिसोदे या कन्येचे एका अपघातात दोन्ही पाय निकामी झालेत. पण शिक्षणाची वा जीवन जगण्याची जिद्द न सोडता खंबीरपणे कृत्रिम पायांवर उभी राहिली. त्याबद्दल हिस शौर्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी किताब देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेत्या पुढील प्रमाणे
सौभाग्यवती स्पर्धेतील प्रथम क्रमांक डॉ. मेंगडे, द्वितीय क्रमांक डॉ. शितल चौधरी आणि तृतीय क्रमांक रुपाली पैठणे तर कुमारी गटाच्या सौंदर्यसम्राज्ञी प्रथम क्रमांक स्नेहल कहाडे, द्वितिय क्रमांक माधुरी लोखंडे तर तृतीय क्रमांक मानसी दिघे यांनी पटकाविला. विजेत्या सर्वांना मुकुट आणि विविध बक्षिसे प्रदान करण्यात आली. 12 महिन्यात 18 जिल्हांमधून 30 विजेत्यांमधून हे स्पर्धक महाअंतिक सोहळ्यासाठी आले होते. महाअंति महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी प्रतियोगितेत विभागिय सौंदर्यसम्राज्ञी विजेत्यापुढीलप्रमाणे आहेत. विदर्भ विभाग सौंदर्यसम्राज्ञी सौभाग्यवती गटात करुणा कदम आणि विदर्भ सौंदर्यसम्राज्ञी दुर्गा उगवेकर, तर खान्देश सौंदर्यसम्राज्ञी सौभाग्यवती गटात वैशाली आहिरे आणि खान्देश सौंदर्यसम्राज्ञी कल्याणी बोरसे तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागातून सौंदर्यसम्राज्ञी स्नेहल चौगुले आणि पुर्वा कोडलीकर तर कोकण सौंदर्यसम्राज्ञीचा मान प्रियंका शिंदे आणि अर्चना परब, मराठवाडा सौंदर्यसम्राज्ञी कविता जाधव, उपविजेती निलम गलांडे ठरल्या.