महालक्ष्मी ट्रस्टतर्फे प्रदूषण मुक्त दिवाळीचा संदेश
भुसावळ- शहरातील खडका रोड विभागातील प्रसिद्ध महालक्ष्मी माता मंदिरात 8 नोव्हेंबर रोजी दोन हजार दिव्यांची रोषणाई मंदिर परीसरात महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महालक्ष्मी ट्रस्ट तर्फे प्रदूषण मुक्त दिवाळीचा संदेश देण्यात आला. पाडव्याच्या मुहूर्तावर दिवाळीतल्या पणतीसोबतच ‘विवेकाचा दिवा’ लावण्याचा निश्चय करत महालक्ष्मी ट्रस्टच्या सदस्यांनी रोषणाई केली.
आपल्या आत हा ‘विवेकाचा दिवा’ सदैव तेवता राहिला तर बरेच प्रश्न सुटतील. समाज म्हणून किमान सौहार्द, सौजन्यशीलता, परस्परांविषयी आदर आणि आपुलकी या मूलभूत भावनांची जपणूक करण्याची कधी नव्हे एवढी गरज आज निर्माण झाली आहे. समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा वारसा भुसावळच्या मातीने सदैव जपला आहे. जगण्याचा समरसून आनंद घेणे, चांगल्या कलाकृतींना दाद देणे आणि जगण्यातले मंगल सदैव जपा असा सल्ला ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिला. जगण्यातल्या आनंदाचा प्रकाशमान दिवा आपल्या अंत:करणात सदैव तेवत राहो, अश्या शुभेच्छा ही पाटील यांनी दिल्या.
मनमोहक रांगोळीने मोहित केले
विद्या जोशी, शीतल जोशी, गौरव जोशी, युगंधारा लोखंडे, उषा जोशी, वृषाली पाटील, तेजल भारंबे, कल्पना पाटील, मनीषा पाटील, वंदना कुरकुरे, स्मिता येवलेकर, भारती तळेले, गीता बर्हाटे यांनी काढलेल्या जय महालक्ष्मी माता, श्री, ओंकार , स्वस्तिक च्या मनमोहक रांगोळीने वातावरण ढवळून निघाले. दिव्यांच्या प्रकाशाने सांकृतिक परंपरा ट्रस्टतर्फे जोपासण्यात आली आहे.
यांचे लाभले सहकार्य
महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष सुरेश बर्हाटे, सचिव मनोहर बर्हाटे, झेंडूजी महाराज बेळीकर संस्थेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे, प्रा.धीरज पाटील, अर्जुन भोगे, चंद्रकांत पाटील, निवृत्ती महाराज दंडगव्हाळ, प्रकाश पाटील, लिलाधर भारंबे, अरविंद कुरकुरे, मधुकर लोखंडे, दिलीप बर्हाटे, सोपान पाटील, रवींद्र पाटील, किशोर पाटील, दीपक झांबरे, जितेंद्र भारंबे, संदीप लोखंडे, दीपक बर्हाटे, लतेश भारंबे, संजय बर्हाटे, धर्मराज देवकर, प्रसाद पाटील, अभिषेक पाटील, संजय पाटील, चेतन भारंबे, प्रीतम बर्हाटे, बंडू भारंबे यांचे सहकार्य लाभले.