महालखेडा येथील शेतकर्‍याचा मृतदेह आढळला

0

मुक्ताईनगर- तालुक्याील महालखेडा येथील शेतकरी संतोष रतीराम सोनार (38) यांचा 7 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महालखेडा शिवारातील गट क्रमांक 37 मधील नाल्याजवळ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस पाटील सुनील वाघ यांचे खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहेत. दरम्यान, शेतकर्‍याचा मृत्यू कसा झाला? याबाबत पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे.