नंदुरबार: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ नंदुरबारला भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले.कोरोना विषाणुचा महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असुन या वाढत्या फैलावामुळे राज्यातील व्यापारी, शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, आदिवासी,दलित संचारबंदीच्या संकटात सापडले आहे. राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नसल्याने पोलीस प्रशासन व डॉक्टर यांच्यावर समाजकंटकाकडुन हल्ले होत आहे.
केंद्र सरकार विस्तारीत स्वरूपात मदत कार्य करीत असताना महाविकास व आघाडीच्या राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत राज्यातील जनतेला केली जात नसल्याने कोरोनाच्या संचारबंदीत लॉकडाऊन झालेली जनता अडचणीत आहे. यावरूनच भाजपने आंदोलन केले आहे.
जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदशर्नाखाली येथील भाजप जिल्हा कार्यालयावर सोशल डिस्टंनचे पालन करत काळया फिती लाऊन जिल्हा कार्यालयाबाहेर निषेधाचे फलक हातात घेऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केंद्रातील मोदी सरकार प्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने देखील पॅकेज दयावे नंदुरबार जिल्हयातील आदिवासी जनतेला खावटी कर्ज दयावे, 100 टक्के अनुदानावर विविध योजना सुरु कराव्यात, नंदुरबार जिल्हयातील शेतकऱ्यांची संपुर्णपणे कर्जमुक्ती करण्यात यावी, जिल्हयातील बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता मिळावा, पोलीस व डॉक्टरांवरील त्वरित थांबवावे, अशी मागणी केली. यावेळी निलेश माळी, माणिक माळी, केतन रघुवंशी, नरेंद्र माळी, हर्षल पाटील, जयेश चौधरी, संजय साठे, योगिता बडगुजर आदी उपस्थित होते.