धुळे । महावितरणकडून शेतकर्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरु असून ती त्वरीत बंद करावी, अशी मागणी करीत आज समाजवादी पार्टीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. धुळे जिल्ह्यात शेतकर्यांचे कमी पावसामुळे, कपाशीच्या बोंडअळीच्या प्रार्दुभावाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाब बंद असल्याने, शेतमालाला भाव नसल्याने अतोनात नुकसान होऊन शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे. तो आत्महत्या करण्यासाठी मजबूर झाला आहे.
थकीत वीजबिल भरण्यासाठी मुदत द्या
वीज शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडणे बंद करा-स.पा. वितरणाचे कर्मचारी विनाकारण शेतकर्यांना मानसिक त्रास देऊन वीज कनेक्शन तोडत आहेत. एकीकडे लोडशेडींग सुरु आहे. ते बंद करावे आणि शेतकर्यांना थकीत वीज बिल भरण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात यावी, थोडी माणुसकी दाखवून नरमाईचे धोरण अवलंबवावे. अन्यथा मुलायमसिंग युथ ब्रिगेड आणि समाजवादी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करुन महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा या निवेदनातून गोरख शर्मा, अश्पाक मिर्झा, मोहसीन शेख, राजकुमार व्यास, जमील मन्सुरी, वसीम शेख, गुलाम कुरेशी, अजमद शेख, जाकीर खान, महेश शर्मा, राजेश पाटील, गणेश चौधरी यांनी दिला आहे.