महावितरणचा युनिट घोटाळा

0

वीज बिलाची आकारणी करताना मागील वर्षीची केली तुलना

वीज बिल हातात घेताच शॉक

जळगाव: कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होता. त्यामुळे प्रत्यक्ष रिडींग घेतले गेले नसल्याने सरासरी वीज बिलाची आकारणी केली गेली. मात्र आता लॉकडाऊन अन लॉक होताच वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे. सरासरी बिल दिल्यानंतर जून महिन्यात अक्षरशः बिलाची चौपट आकारणी केली गेली असल्याचे स्पष्ट झाल्याने महावितरणमध्ये युनिट घोटाळा समोर आला आहे.

मार्च ,एप्रिल, मे, महिन्याचा दरमहा विजेचा भरणा केल्यानंतरही लॉकडाऊन ग्राह्य धरून जून महिन्यात विजेचे युनिट चौपट आकारणी करून वीज बिल ग्राहकांना दिले आहे. नियमित भरणा केल्यानंतरही जून महिन्याचा अव्वाच्या सव्वा बिल पाहून ग्राहकांना शॉक लागला आहे.लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आता एवढे मोठे बिल कसे भरावे असा सवाल उपस्थित झाला आहे.

जून महिन्याच्या बिलाची आकारणी करताना मागील वर्षी एप्रिल, मे, जून महिन्याची आणि यावर्षी याच महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे तसेच उन्हाळा असल्याने वीजेचा अधिक वापर झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

“एप्रिल, मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे विजेचा अधिक वापर होतो. त्यातल्या त्यात लॉकडाऊनच्या काळात अधिक वापर झाला आहे. विजेचे दर देखील वाढले आहे.
संजय तडवी
कार्यकारी अभियंता, महावितरण, जळगाव.