पुणे । महावितरणची थकबाकीदारांकडून वीजबील वसुलीची मोहीम तीव्रपणे सूरू आहे. मार्च अखेर महसूल वसूलीसाठी आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वसूली करण्यात येत आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरु असतानाच ज्या ग्राहकांनी वीजबीलांचा भरणा भरला आहे, त्या ग्राहकांचाही महावितरण कर्मचार्यांनी वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महसुलापेक्षा खर्च अधिक
महावितरणला वीजपूरवठ्यातून वर्षाकाठी मिळत असलेला महसूल आणि त्याच्या काही पट अधिक होणारा अवास्तव खर्च असे उलटे माप असल्याने महावितरणची डोकेदूखी वाढली आहे. यामुळे महावितरणच्या जमाखर्चाचे गणितच बिघडले आहे. हा ताळमेळ बसविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच देणेकर्यांची देणी अधिकच वाढत चालली असून कर्ज घेतलेल्या बँकांनी तगादा लावण्यास सुरुवात केली आहे.

पुण्याला जास्तीचे टार्गेट
पुणे हे राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारे परिमंडल आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुणे परिमंडलाला जास्तीचे टार्गेट दिले आहे. प्रशासन आणि वरिष्ठ अधिकार्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मुख्य अभियंता मल्लेशा शिंदे, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, महेंद्र दिवाकर आणि सुंदर लटपटे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी विभागनिहाय पथकांची नेमणूक करण्यात आली असून ही पथके टोळीने फिरुन महसूल वसूली करत आहेत.