महावितरणचे 70 कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्काराचे मानकरी

0

आंतरराष्ट्रीय कामगार दिनी वितरण सोहळा ; कामगार कल्याणकारी योजना, योग साधना, ताण-तणाव मुक्ती व थॅलेसिमिया आजाराविषयी मार्गदर्शन

जळगाव – आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्याने 1 मे 2019 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित जळगांव परिमंडळाच्या वतीने सन 2018-19 या वर्षात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल 70 कर्मचार्‍यांना गुणवंत कामगार व विशेष कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा- महावितरण व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत कामगार मेळावा व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 1 मे, बुधवार रोजी लघु प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यास जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, अधिक्षक अभियंता फारुख शेख, सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) धैर्यशिल गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, प्रा.शैलेश शिरसाठ, प्रा. डॉ. शरदअकोले, योगशिक्षक सागर साळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी पुरस्कार वितरणासह कामगार कल्याणकारी योजना, योग साधना, ताण-तणाव मुक्ती व थॅलेसिमिया आजार या विषयी मार्गदर्शन होणार आहे. या सोहळ्यास अधिकारी- कर्मचार्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर व कामगार कल्याण केद्रप्रमुख मिलिंद पाटील यांनी केले आहे.

धुळे मंडळ तंत्रज्ञ संवर्गातील पुरस्कार प्राप्त कामगार
हिरामण विठ्ठल अहिरे (वरखेडी), सत्यवान मंगलसिंग गायकवाड (नरडाणा), भटू भाऊराव अहिरे (धुळे), दिनेश सोत्या वसावे (धुळे), राकेश छगन पायमोडे (मुकटी), जयराम रामचंद्र जाधव (साक्री), नितीन वासुदेव तायडे (पिंपळनेर), शांताराम रघुनाथ सोनवणे (चिमठाणा), प्रदिप लक्ष्मण मराठे (दोंडाईचा), राजेंद्र कमलसिंग राजपुत (होळनांथे), सुनिल वसंत वसावे (वरुळ), दिपक दत्तात्रय माळी (धुळे) यंत्रचालक संवर्ग- राजेंद्र दत्तात्रय पवार (नरडाणा), अरविंद आनंदा ऐतवाडे (जैताणे), युवराज नानाभाऊ पाटील (शिंदखेडा)

जळगाव मंडळ पुरस्कार प्राप्त कामगार
मुस्तफा मेहबुब तडवी (डोंगर कठोरा), भुषण सुभाषसिंग परदेशी (रावेर), प्रविण प्रकाश पाटील (यावल), पंकज सुपडू पाटील (वाघोदा), केशव तुकाराम अत्तरदे (साकेगाव), जगन्नाथ बुधो पाटील (भुसावळ), नितेश भगवान देशमुख (वाकोद), अनिल सोमा सुरवाडे (जामनेर), निलेश भाऊराव घरात (चाळीसगांव), दिपक आधार मोरे (तळेगाव), गोविंदा बहादर्‍या पावरा (चाळीसगाव), राकेश सुभाष सुर्यवंशी (जामदा), अतुल भास्कर पालवे (बोदवड), समाधान प्रल्हाद बावने (वरणगाव), प्रमोद तोताराम क्षिरसागर (कुर्‍हा काकोडा), नरेंद्र मधुकर परदेशी (भादली), विक्की यशवंत पाटील (जळगांव), रामकृष्ण महारु बारी (वावडदा), भरतरीनाथ पंढरीनाथ अनुसे (जळगांव), संजय बारसु गुरुचळ (चोपडा), माधवराव हिरामण चौधरी (अमळनेर), प्रविण वना खैरनार (दहिवद), सुधाकर शंकर विसावे (धरणगांव), सतिश मुरलीधर पाटील (हातेड), गोवर्धन आनंदा लोखंडे (वरखेडी), सतिश भिकन गोसावी (पाचोरा), नाना माणिक अहिरे (पारोळा) यंत्रचालक संवर्ग- किशोर बाबु कोष्टी (विवरा), अशोक जनार्धन भिरुड (भुसावळ), पांडुरंग प्रल्हाद चौधरी (वाघळी), गोपाळ श्रीराम मोले (कुर्‍हा काकोडा), विकास नेमा चौधरी (महाबळ), तुषार जगतराव साळूंखे (अमळनेर), भगवान पंढरीनाथ शिंपी (लासगांव)

नंदुरबार मंडळ पुरस्कार प्राप्त कामगार
रमाकांत पुंडलीक ठाकुर (नंदूरबार), राहुल काशिनाथ साळवे (धानोरा), सुरेश पुनमचंद पटेल (रनाळा), निर्मल शिवता गावित (नवापूर), देविदास हिम्मत पवार (तळोदा), दयानंद अनंत भामरे (धडगाव), दिपक कोचरु पाडवी (अक्कलकुवा), संजय विठ्ठल पाटील (शहादा), राजु दलजी पावरा (म्हसावद) यंत्रचालक संवर्ग- अनिल चैत्राम पाटील (आष्टा), सागर संतु भादवनकर (म्हसावद)

विशेष कार्य पुरस्कार
क्रीडा, नाट्य व विशेष कामगिरी – चेतन पंडित केदार (चिमठाणा), संकेत जयवंत वाकडे (नांद्रा), पराग पंढरीनाथ बडगुजर (बोदवड), भरत धन्यकुमार उकलकर (चाळीसगांव), चेतन सुधाकर सोनार (धरणगांव), कु. पुनम भाऊसाहेब थोरवे (धरणगांव), पराग प्रभाकर चौधरी (धरणगांव), जोगेंदर शांताराम मोरे (जळगांव), मुकेश गोरख अहिरे (जळगांव), तुषार गोपाळ झोपे (वरणगांव)

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे पुरस्कार
प्रताप नारायण सपकाळ (महावितरण), पितांबर गोपाळ सरोदे (बॉश), अशोक बारी (सुप्रिम) अशी पुरस्कार विजेत्यांची नावे आहेत.